Dharma Sangrah

'Teddy Day' Special Recipes अतिशय क्युट टेडी डे रेसिपी बनवून पार्टनरला द्या 'सरप्राईज'

Webdunia
मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 (08:00 IST)
व्हॅलेंटाईन वीक जो प्रेमासाठी ओळखला जातो. आज टेडी डे असून तुम्ही टेडी बेअरच्या आकाराचा एखादा पदार्थ बनवला तर तो खरोखरच 'सरप्राईज' ठरेल.
 
टेडी बेअर चॉकलेट बॉल 
साहित्य-
१ पाकीट ओरिओ बिस्किटे
४ चमचे क्रीम चीझ किंवा कंडेन्स्ड मिल्क
विरघळलेले डार्क आणि व्हाईट चॉकलेट 
 
कृती-
सर्वात आधी बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात क्रीम चीझ घालून घट्ट गोळा मळा. याचे छोटे गोळे करा. विरघळलेल्या डार्क चॉकलेटमध्ये हे गोळे बुडवून बटर पेपरवर ठेवा. टेडीचे कान बनवण्यासाठी बिस्किटाचे छोटे तुकडे किंवा लहान गोळ्या बाजूला लावा. व्हाईट चॉकलेटने डोळे आणि नाक तयार करा. १० मिनिटे फ्रिजमध्ये सेट करा.
 
टेडी फेस सँडविच 
साहित्य-
ब्रेड स्लाईस
पीनट बटर किंवा चॉकलेट स्प्रेड
केळीचे काप
ब्लॅकबेरी किंवा काळे द्राक्ष
 
कृती- 
सर्वात आधी ब्रेडचा एक स्लाईस घेऊन त्याला गोलाकार कापून घ्या. त्यावर पीनट बटर किंवा नुटेलाचा जाड थर लावा.  केळीचे दोन काप कानाच्या जागी आणि एक काप नाकाच्या जागी ठेवा. नाकावर आणि डोळ्यांच्या जागी काळी द्राक्ष किंवा चोको चिप्स लावा. तुमचा एडिबल टेडी तयार!
 
टेडी बेअर पॅनकेक 
साहित्य- 
१ कप मैदा
१ कप दूध
२ चमचे साखर
१ चमचा बेकिंग पावडर
मध किंवा चॉकलेट सिरप
 
कृती- 
सर्वात आधी सर्व साहित्य एकत्र करून गुठळ्यारहित बॅटर बनवून घ्या. पॅनवर थोडे तूप लावा. मध्यभागी एक मोठा गोल आणि त्याच्या वरच्या बाजूला दोन छोटे गोल अशा आकारात बॅटर ओता. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. सर्व्ह करताना चॉकलेट सिरपने डोळे आणि तोंड काढा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: व्हॅलेंटाईन डे विशेष रेसिपी Heart Shape Pancake
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Valentine's Day Special चॉकलेट मिल्कशेक रेसिपी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

उष्माघातापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे ७ सोपे घरगुती उपाय करून पहा

Kitchen Tips पनीर तळताना तव्याला चिकटते का? या सोप्या युक्त्या वापरून पहा

हार्मोनल आरोग्य सुधारण्यासाठी या योगासनांचा सराव करा

तेनालीराम कहाणी : नवीन परिमाणे

Kitchen Trolleys किचन मधील ट्रॉल्या स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती

पुढील लेख
Show comments