कधी कधी अचानक घरी पाहुणे येतात. मग प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पाडतो की आता काय नाश्ता बनवावा. अशावेळेस काय करावे आम्ही तुम्ह्लाला सांगणार आहोत. तर कमी वेळात बनवा लच्छा पकोडे, जे खाल्यास पाहुणे देखील खुश होतील व तुमचा वेळ देखील वाचेल. तर चला रेसिपी नोट करून घ्या.
साहित्य
2 बटाटे
1 कप बेसन
हिरवी मिरची
कोथिंबीर आणि पुदिना
अर्धा कप मैदा
लाल तिखट
धने पावडर
3 कांदे
पालक बारीक कापलेला
चवीनुसार मीठ
1 चमचा ओवा
चिमूटभर हिंग
चिमूटभर सोडा
कृती
बटाटे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर या बटाट्यांना साल न काढता पातळ आणि लांब आकारात कापावे. तसेच कांदा देखील धुवून घ्यावा आणि पातळ, लांब आकारात कापावा. आता यांमध्ये पालक मिक्स करा. तसेच कोथिंबीर आणि पुदिना टाकावा. बारीक कापलेली हिरवी मिरची टाकावी. आता या सर्वांना एकत्रित मिक्स करून त्यावर धणे पावडर टाकावी. ओवा, हाँग, हळद, मीठ, सोडा हे देखील घालून चांगले मिक्स करावे. व हातावर घेऊन थोडेसे पाणी घालावे म्हणजे सर्व भाज्या ओल्या होतील. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेऊन हे मिश्रण छोट्या छोट्या आकारांमध्ये तेलात फ्राय करावे. मग हे पकोडे पुन्हा एकदा तेलात टाकून गरम करावे यामुळे ते कुरकुरीत होतात. गरम गरम लच्छा पकोडे पाहुण्यांना सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik