Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अक्षय तृतीयेला करा वाटली डाळ-करंजीचा बेत

अक्षय तृतीयेला करा वाटली डाळ-करंजीचा बेत
, शुक्रवार, 14 मे 2021 (09:19 IST)
अक्षय तृतीयेला सुवासिनींना हळदी-कुकुंवासाठी निमंत्रण दिले जाते. महिनाभर माहेरवाशिणी म्हणून अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वतीचं समोर आरस मांडून हळदी-कुकुंवाच्या समारंभात डाळीचं आणि करंजीचं नैवेद्य दाखवलं जातं. जाणून घ्या सोपी कृती-
 
वाटली डाळ: 
साहित्य :
दोन वाट्या चण्याची डाळ
पाव वाटी कैरीचा कीस
पाच-सहा हिरव्या मिरच्या,
तीन-चार सुक्या मिरच्या,
मीठ चवीप्रमाणे,
साखर चवीला,
ओले किंवा सुके खोबरे,
कोथिंबीर,
फोडणीचे साहित्य.
 
कृती :
डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी.
त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी.
नंतर ती मिक्सरमधून मिरच्यांसह वाटून घ्यावी.
‍या मिश्रणात मीठ, साखर, कैरीचा कीस हे सर्व जिन्नस घालून ठेवावं.
अर्धी वाटी तेल कढईत गरम करुन त्यात मोहर्‍या, हिंग, जीरे खमंग फोडणी करावी.
त्यात डाळीचं मिश्रण घालून मंद आचेवर शिजवावी.
शिजल्यावर वरुन खोबरा बुरा व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
 
*************** 
 
करंजी-
साहित्य:
४ वाट्या नारळाचा चव
२ वाट्या साखर
३ वाट्या मैदा
दीड वाटी रवा
२ टेस्पून तांदूळ पिठी
६ चमचे तेलाचे मोहन
दुध
मीठ चिमुटभर
तळण्यासाठी तूप,
वेलचीपूड
 
कृती:
रवा, मैदा, मीठ, तेलाचं कडकडीत मोहन घालून घट्टसर भिजवा.
भिजल्यावर भरपूर मळा.
नारळ चव, साखर एकत्रं घट्टसर शिजवा.
तादंळाची पिठी घाला.
एकसारखे मिळवून घ्या.
गरज भासल्यास दुधाचे शिपके देऊन शिजवा.
खाली उतरवून वेलचीपूड घाला.
भिजविलेल्या कणकेच्या एकसारख्या लाट्या करुन पारी लाटून सारख भरा.
दोन्ही कडा दुधाच्या हाताने पक्क्या करा.
दुमड घालून करंज्या तयार करा.
ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा.
सर्व तयार झाल्यावर मंद आचेवर तेलात किंवा तुपात गुलाबी तळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Special Story : Corona काळात तणावातून मुक्त कसे व्हावे, मानसोपचार तज्ञाकडून जाणून घ्या