rashifal-2026

चायनीज व्हेज फिंगर्स

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (14:02 IST)
साहित्य : उकडून स्मॅश केलेले बटाटे, दोन टेबलस्पून चिरलेला कोबी, दोन मोठे तमचे बारीक चिरलेला कांदा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, दोन मोठे चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा सोया सॉस, एक लहान चमचा व्हिनेगर, चिमुटभर अजीनोमोटो, ड्राय ब्रेड क्रम्स, दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ. 
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल घेऊन चांगलं गरम होऊ द्यावं. गरम तेलामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, ढोबळी मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये सोया सॉस, अजिनोमोटो आणि मीठ मिसळावं. हे मिश्रण जास्त शिजवू नये. थोडं क्रंची ठेवावं. तयार झाल्यावर मिश्रण मोठ्या बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात ड्राय ब्रेड क्रम्स मिसळावेत. हाताने वळून मिश्रणाला फिंगर्सचा लंबगोलाकार आकार द्यावा. नंतर ते मक्याच्या पीठामध्ये घोळून घ्यावे. दुसर्‍या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. तेल तापल्यानंतर यात फिंगर्स सोडून लाल रंगावर तळून घ्यावे. कुरकुरीत चायनीज व्हेज फिंगर्स तयार आहेत. टोमॅटो सॉस अथवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी

रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, काय केले पाहिजे

Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 405 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा

हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 सवयी अंगीकारा

पुढील लेख
Show comments