प्रश्न हे अनुत्तरीत
(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा करण्याचे ठरले. वरकर्णी पहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे.....
महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत?
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही?
अजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. राजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तया करणार आहोत की नाही?
दिल्लीच्या निर्भयापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चिमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडियातधून येत असताना या महिलादिनाची उपयुक्तता आरि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे राहत?
देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का?
सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीत बिकट आहे. बहुसंक्य वेळा मानसिक त्रासाला कंटाळून स्त्रियांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत?