Festival Posters

माझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'

Webdunia
' देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा आईविषयी विचार केला, तेव्हा मला या गाण्याचा खरा अर्थ कळला. 

देव सर्वच ठिकाणी असतो असे म्हणतात. आई म्हटल्यानंतर मला खरेच देवत्वाची, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. माझ्या साऱ्या चिंता दूर करण्यासाठी मी आजही आईच्या विचारांचा आधार घेते.

लग्नानंतर खऱ्या अर्थाने मला आईची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली. लग्नाआधी आई हा एकमेव आधार होता. लग्नानंतर झालेली ताटातूट, आईला भेटण्याची उत्कट इच्छा, या साऱ्यांनी पापण्या कधी ओल्या व्हायच्या ते कळायचेच नाही. लग्नाआधी आईने दिलेल्या साऱ्या सूचना नकोशा वाटत, कधी कंटाळा तर कधी राग येई, पण आज खऱ्या अर्थाने तिच्या त्या सूचनांचा, त्या विचारांचा उपयोग मला आयुष्यात पुढलं पाऊल ठेवण्यासाठी होतोय.

आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं. आई म्हणजे त्यागाची भावना, नात्यांचा ताजेपणा, मनातील
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.

आजही दिवसभरात मन उदास झालं की आईची आठवण होते. आवडीचे पदार्थ ती खायला करून द्यायची, बाबांना मनवत मैत्रिणींसोबत चित्रपटाला जायचं म्हटलं की आधी मी आईकडे धाव घ्यायचे.

मी उदास असले, निराश झाले की दिवसभरात झालेल्या घटना ती अगदी ताज्या मनानं माझ्या जवळ बसून ऐकायची. त्या गप्पा कितीही कंटाळवाण्या असल्या तरी तिनं कधी तसं भासवलंच नाही.आजही दु:ख झालं की वाटतं एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन आईला बिलगावं, खूप रडावं.

मला अजूनही वाटतं माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.

मी चिडले की सारा राग माझा आईवरच निघायचा. मी शांत झाले की माफी मागायचे, ति म्हणायची, अगं माझ्यावरच तुझं खरं प्रेम आहे, म्हणून तर माझ्यावर चिडण्याचा अधिकार तू मला दिलास. खरंच आई, मी आज स्वतः आई झाल्यावर मला कळतंय आई बनणं इतकं सोपं नाही. फक्त एकच विनंती आहे, माझ्या पाठीशी सदैव राहा.. अशीच.

- रुपाली बर्वे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Jewelry Storage Tips ज्वेलरी योग्य पद्धतीने कशी ठेवावी?

रविवार स्पेशल बनवा हेल्दी, चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज

हृदयासाठी काळे तीळ फायदेशीर आहे, इतर फायदे जाणून घ्या

Career in B.Sc in Anesthesia : बीएससी इन ऍनेस्थेसिया कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

जड कानातले घातल्यामुळे दुखापत झाली असल्यास या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments