मुंबई : ट्राँबे पोलीस हद्दीमध्ये येणारे महाराष्ट्र नगर मध्ये तीन मे ला संध्याकाळी सहा वाजता 19 वर्षीय तरुणाने शवारमा खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्याच्या पोटात दुखायला लागले व उलट्या सुरु झाल्या. व त्याच्या आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या सोबत इतर जणांनी देखील चिकन खाल्ले होते. त्यांची देखील तब्येत बिघडली पण मिळालेल्या माहिती नुसार आता त्यांची प्रकृती ठीक आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले.
मुंबई पोलीस झोन-6 चे डीसीपी हेमराज राजपूत म्हणाले की, ट्राँबे पोलीस हद्दीमध्ये येणारे महाराष्ट्र नगर मध्ये तीन मे ला संध्याकाळी सहा वाजता 19 वर्षीय तरूणाने शवारमा खाल्ला व दुसऱ्यादिवशी त्याला सकाळी पोटात दुखून उलटी व्हायला लागल्या. कुटुंबीयांनी त्याला जवळच्या डॉकटरांना दाखवले. नंतर तो घरी आला. यानंतर त्याने काहीच खाल्ले नाही.
पाच मे ला तरुणाला परत पोटात दुखून उलटी होण्यास सुरवात झाली. कुटुंबीयांनी त्याला KEM रुग्णालयात दाखवले. जिथे डॉकटरांनी त्याच्यावर उपचार केले व त्याला घरी पाठवले. पण परत संध्याकाळी त्याची प्रकृती बिघडली व याला रुग्णालयात नेण्यात आले. व त्याला तिथे भरती करण्यात आले. पण त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही व अखेरीस सात मे ला सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. व शवारमाचे सँपल तपासणी करीत पाठवण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik