Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माथेरानच्या शार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 पर्यटक बुडाले

water death
, सोमवार, 16 जून 2025 (13:46 IST)
रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिलस्टेशन माथेरान मध्ये अपघात घडला आहे. माथेरानच्या शार्लोट तलावात बुडून नवीमुंबईतील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 
नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील दहा जणांच्या गटातील काही तरुण तलावात आंघोळीसाठी गेले होते  त्यापैकी तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तिघे बुडाले. .
 
पाच तासांच्या शोध मोहिमेत बुडालेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असून सुमित चव्हाण(16),आर्यन खोब्रागडे(19) आणि फिरोज शेख(19) अशी मृतांची नावे आहे. 
या गटातील पाच जण शार्लोट तलावात पोहण्यासाठी गेली असता त्यापैकी एक खोलवर बुडू लागला नंतर चौघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्देवाने इतर दोघे देखील बुडाले. तर इतर दोघे पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. शार्लोट तलाव माथेरान शहराला पाणीपुरवठा देण्यासाठी बांधण्यात आला असून या तलावात पोहण्यास मनाई असून या संदर्भातचे फलक देखील लावण्यात आले असून पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करून पोहण्यासाठी जातात आणि अपघाताला बळी पडतात.
घटनेची माहिती मिळतातच सह्याद्री बचाव पथक, माथेरान पोलीस, महानगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम राबवली. पाच तासांनंतर तिघांचे मृतदेह सापडले .
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: पुण्यात पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात आग लागली, प्रवासी घाबरले