Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील CBI मध्ये 68 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण

68 employees of CBI in Mumbai also contracted coronaमुंबईतील CBI मध्ये 68 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण  Marathi Mumbai News In Webdunai Marathi
, शनिवार, 8 जानेवारी 2022 (23:25 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे 20 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत सीबीआय कार्यालयातील 68 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 20 हजार 318 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर संसर्गामुळे 5 जण मृत्युमुखी झाले आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 6 हजारांच्या जवळपास आहे. शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 रुग्ण आढळले, तर 6 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी देखील 20 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. 
मुंबईतील वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी) येथील केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI) कार्यालयात काम करणाऱ्या सुमारे 68 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 
बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) ला CBI ने BKC कार्यालयात काम करणाऱ्या 235 लोकांची कोविड-19 तपासणी करण्यास सांगितले होते, असे केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, या 235 पैकी 68 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तपास करणाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांचा समावेश होता. बाधितांना घरातच आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत २० हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण राज्यात ४१ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद