Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुणाला अटक केले

A 21-year-old man was arrested in Mumbai with ten pistols marathi news
, रविवार, 20 जून 2021 (12:47 IST)
मुंबईत गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने मुलुंड परिसरातून 21 वर्षीय तरुणाला शस्त्रांसह अटक केली आहे.आरोपीचं नाव लखनसिंह चव्हाण असून तो मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातला आहे. हा तरुण मुबंईत कोणाला शस्त्र पुरवठा करण्यासाठी आला होता.आरोपीकडून 10 पिस्तुलांसोबत 12 काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. तसेच केएफ मेडच्या 6 राउंडचाही समावेश आहे.
 
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,सदर आरोपी आपल्या घरातच शस्त्र बनवून विक्री करण्याचे माहित झाले आहे त्याचे मामा समवेत त्याचे अवघे कुटुंबच या शस्त्र विक्रीच्या व्यवसायात सहभागी आहे.सदर आरोपी बऱ्याच वर्षांपासून हा व्यवसाय करीत असून त्याच्या वर कोणाला काही शंका येऊ नये म्हणून तो खासगी वाहनाने प्रवास करीत शस्त्र पुरवठा करीत होता.
 
या वेळी सुद्धा तो शस्त्र पुरवठा करण्यासाठी निघाला होता,गुन्हे शाखेच्या पथकाला विश्वासार्ह सूत्रांकडून माहिती मिळाली होती की आरोपी एखाद्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे पोहोचवण्यासाठी मुंबईत येत आहे, त्यानुसार त्यांनी अटक केली.याच टोळीशी संबंधित व्यक्तींना काही काळापूर्वी गुन्हे शाखेने शस्त्रांसह अटक केली होती.आज लखनसिंह ला देखील अटक करण्यात आली असून आरोपी कोणासाठी  एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवीत होता त्याचा शोध घेत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलासादायक बातमी !राज्यात 57 लाख रुग्ण कोरोना मुक्त झाले,10373 रुग्ण बरे झाले