Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत हिरा व्यापाराची गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (16:47 IST)
व्यवसायात तोटा झाल्यामुळे मुंबईत एका हिरा व्यापाराने गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय शहा(65) असे या हिरा व्यापाराचे नाव आहे. 

ते महालक्ष्मी परिसरात एका अपार्टमेंट मध्ये राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. मयत संजय शहा यांचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालय होते ते तिथे हिरा व्यवसायी होते. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. 

त्यांना व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे ते तणावात होते. तणावात येऊन त्यांनी रविवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया जवळ ताज हॉटेलच्या समोर अरबी समुद्रात उडी घेतली आणि आत्महत्या केली. 
रविवारी सकाळी मॉर्निग वॉक साठी जायचे सांगून शहा यांनी टॅक्सी घेतली आणि वांद्रे वरळी सी लिंकवरून जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र, टॅक्सी चालकाने तिथे गाडी थांबविण्यास नकार दिला. नंतर त्यांनी टॅक्सी चालकाला गेटवे ऑफ इंडियाला नेण्यास सांगितले आणि तिथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. 

समुद्राच्या उंच लाटांमुळे त्यांना वाचवता आले नाही. दोरीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. 

काही दिवसांपूर्वी वरळी- बांद्रा सी लिंक वरून कर्जबाजारामुळे वैतागून भावेश शेठ यांनी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती.भावेश यांच्या वाहनातून सुसाईड नोट सापडली असून त्यांनी आपल्या मुलाला फोन वरून कल्पना दिली होती. 

तसेच ममता कदम नावाच्या 23 वर्षीय तरुणीने वैयक्तिक कारणामुळे मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. 
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा 2025

IPL 2025 : आयपीएलबाबत मोठी घोषणा, स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

पाकिस्तानी हल्ल्यामुळे राजस्थानमध्ये अनेक गाड्या रद्द, जम्मूहून विशेष ट्रेन धावणार

LIVE: डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे-आयएमए महाराष्ट्र

रात्रीच्या वेळी घराबाहेर वाहन पार्क केल्यास भरावे लागेल पार्किंग शुल्क, कोणत्या शहरांमध्ये आदेश जारी करण्यात आला आहे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments