Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनावट चलनी नोटा छापून त्या व्यवहारात आणणारी टोळी पकडली, तब्बल ७ कोटी रुपये जप्त

A gang of counterfeit currency notes was caught and Rs 7 crore was seized in mumbai
, गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:40 IST)
मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात सात जणांच्या  या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २००० रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले. २००० रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि २८,१७० रोख रक्कम सापडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकारचे डोक फिरलं आहे ,म्हणत फडणवीसांकडून सरकारवर टीका