Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जामीन मिळाल्यावर अबू आझमी तपास अधिकाऱ्यां समोर हजर

abu azmi
, बुधवार, 12 मार्च 2025 (15:26 IST)
सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यावर न्यायालयाने पोलिसांना आणि अबू आझमींना सूचना दिल्या आहे. 
अबू आझमी जामीन मिळाल्यावर मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. न्यायालयाने त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर तीन दिवसांसाठी सही करण्यास सांगितले आहे. आणि तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. 
पोलिसांना न्यायालयाने प्रश्न केले की त्यांनी जबाब घेतला का? किंवा तुम्ही वाचले का? यावर पोलिसांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यावर न्यायालयाने पोलिसांना विचारले मग अशा प्रकारे एफआयआर कसा नोंदवला गेला. 
सपा आमदार अबू आझमी यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले होते की, अबू आझमी यांना12, 13 आणि 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. 20,000 रुपयांच्या सॉल्व्हेंट सिक्युरिटी बॉन्डवर अबू आझमी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाईन-बियर दुकानांसाठी सोसायटीचे एनओसी अनिवार्य, अजित पवारांनी मोठी घोषणा केली