इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला उशीर झाल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. हे विमान मुंबईहून दोहाला जात होते, असे सांगण्यात येत आहे. फ्लाइटची वेळ पहाटे 3:55 होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर झाला.
यावेळी प्रवाशांना बराच वेळ विमानात बसून ठेवण्यात आले. यानंतर प्रवाशांनी इंडिगो एअरलाइन्सवर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. प्रवाशांचा आरोप आहे की, त्यांना विमानात बसायला लावले होते, मात्र इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला उशीर होण्याचे कारण तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. पहाटे 3:55 च्या इंडिगो एअरलाइनचे मुंबईहून दोहाला जाणारे फ्लाइट टेक ऑफ झाले नाही. यानंतर प्रवाशांनी एकच गोंधळ घातला.
विमानात बसल्यानंतर सुमारे 3 ते 4 तास थांबायला लावले, त्यानंतर त्यांनी तक्रार केली. यावेळी विमानतळावर प्रवासी आणि इंडिगो कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
विमान कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नसून त्यांना विमानतळाबाहेर पडण्याची परवानगीही मिळत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मात्र, काही वेळापूर्वी विमान कंपन्यांनी त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत असल्याचे सांगितले. या विमानातील सुमारे 250 ते 300 प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले आहेत.