Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आणि हिंदू महासभा रुग्णालयात ५० जणांना ऑक्सिजन पुरवला

आणि हिंदू महासभा रुग्णालयात ५० जणांना ऑक्सिजन पुरवला
, गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:10 IST)
मुंबईतील घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात कोविड बाधितांसाठी ऑक्सिजनसाठ्याची कमतरता जाणवत असल्याची माहिती प्राप्त होताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या रुग्णालयात ऑक्सिजन साठा पोहोचवला. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व ६० रुग्ण सुरक्षित आहेत. 
 
एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविड बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये ५० जणांना ऑक्सिजन पुरवला जात आहे तर ११ रुग्ण जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) वर आहेत. सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच ऑक्सिजनसाठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने महानगरपालिकेला कळवली.
 
महानगरपालिकेच्या एस विभागातून ९ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहचवले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित ऑक्सिजन पुरवठादाराने ४ ड्युरा सिलेंडर रुग्णालयात सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखला गेला. त्यासोबत एन विभागातून देखील १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुदैवाने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही. हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका