Dharma Sangrah

बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होणार-मुंबई उच्च न्यायालय

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2025 (18:10 IST)
बदलापुरात गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये 4 आणि 5 वर्षाच्या मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यावर आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून नेताना आरोपीने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याचे एन्काउंटर केले. तसेच या प्रकरणी आरोपी, शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापनातील दोन सदस्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 
ALSO READ: ठाण्यात अल्पवयीन मुलाने ट्रक चालवून एकाला चिरडले, एक जखमी
या प्रकरणी राज्यसरकारने स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने प्रकरणाचा तपास करत आरोपपत्र दाखल केले. अत्याचारप्रकरणी सुनावणी जलद गतीने करण्यात यावी असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. 
या प्रकरणात स्थानिक बदलापूर पोलिसांनी तत्परतेने एफआयआर नोंदवली नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने घटनेची दखल स्वतःहून घेतली. आरोप पत्र दाखल झाले असून प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. आता खटला पुढे जाईल.

पीडित मुली अल्पवयीन असल्यामुळे प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर काढावा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, पॉस्को कायद्यातील तरतुदींनुसार, या खटल्याच्यावेळी महिला वकिलाला हजर राहावे लागणार.तसेच खटल्यातील विशेष सरकारी वकिलाला मदत करण्यासाठी एका महिला फिर्यादीची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 20 जानेवरी रोजी होणार आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एक नवीन वळण; उमेदवारांच्या मृत्यूमुळे तीन भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

वसई-विरारमध्ये ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

पुढील लेख