Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून मुंबई पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासकावर

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (07:45 IST)
१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत  ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता सर्वपक्षीय २२७ नगरसेवक व ५ नामनिर्देशित नगरसेवक यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पालिकेने राहण्यासाठी दिलेला राणीच्या बागेतील बांगला खाली करून द्यावा लागणार आहे. पालिकेने विविध समिती अध्यक्षांना वापरासाठी दिलेल्या गाड्या पालिका गॅरेजमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे आता आजपासून म्हणजे ८ मार्च रोजीपासून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी ही प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या खांद्यावर येणार आहे. पालिकेशी संबंधित महत्वाचे धोरणात्मक निर्णय तेच घेतील.
 
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिकेवर प्रथमतः १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कालावधीसाठी प्रशासक नेमण्यात आली} होता. या घटनेला आज ३८ वर्षे होत आली. एवढया वर्षांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला साधे एखादे पत्रकही आलेले नसल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, १९९० ते १९९२ या कालावधीत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालिकेचा कार्यकाल वाढविण्यात आलेला होता. यावेळीही पालिकेवर प्रशासक न नेमता पालिकेचा कार्यकाळ वाढविण्यात यावा, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments