Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अलिबागजवळ मांडवा जेट्टीत भर समुद्रात बोट उलटूनही ७८ प्रवासी सुखरूप

Webdunia
शनिवार, 14 मार्च 2020 (16:28 IST)
मुंबई – अलिबाग प्रवासासाठी सोयीचं ठरलेल्या जलवाहतुकीतील प्रवासी बोट अलिबागमधील मांडवा जेट्टीवर उलटली होती. या बोटीतील ७८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून आज सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.
 
मांडवा जेट्टीपासून जवळच असलेल्या खडकावर ही बोट आदळल्याने हा अपघात झाला. गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबागच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून जेमतेम १ किलोमीटर अंतरावर असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. बोटीचा अपघात झाला तेव्हा सुदैवाने जवळच पोलिसांची गस्ती बोट होती. बोटीतील कर्मचारी तसेच पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत मदतकार्य सुरू केले. बोटीत ७८ प्रवासी होते. या सर्वांना वाचवण्यात यश आले.
 
गस्ती बोट तसेच स्पीड बोटच्या साह्याने सर्व प्रवाशांना मांडवा जेट्टीवर नेण्यात आले. ही बोट लाकडाची असून नियमित प्रवासीसेवा करणारी होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments