Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवा, उच्च न्यायालयाचा आदेश

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (17:04 IST)
मुंबईतील कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले असून ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे.  यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.
 
सुनावणी दरम्यान सरकारने निर्णय मागे घेण्याची आणि संबंधित पक्षकारांना नव्याने सुनावणी देण्याची तयारी दाखवली. पण कारशेडचे काम सुरू ठेवू देण्याची विनंती केली. केंद सरकार आणि हस्तक्षेप याचिका करणाऱ्याने विरोध दर्शवल्यानंतर सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत जागा हस्तांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देत कारशेडच्या कामालाही मज्जाव केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळील गावातील जंगलात वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली

ठाण्यात दृश्यम' शैलीतील घटना! चार वर्षांपूर्वी बेपत्ता तरुणाच्या हत्येचा गुन्ह्याचा उलगडा, आरोपीला अटक

LIVE: चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

एआय वापरून बाळासाहेबांचे भाषण तयार केले,चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

दक्षिण आफ्रिकेत नीरज चोप्राने 84.52 मीटर थ्रोने हंगामाची सुरुवात केली

पुढील लेख
Show comments