Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळी सणासाठी मध्य रेल्वे कडून मुंबई ते पुणे 14 जादा गाड्या धावणार, हे आहे वेळापत्रक

Central Railway will run 14 extra trains from Mumbai to Pune for Holi
, शुक्रवार, 11 मार्च 2022 (16:47 IST)
मध्य रेल्वेने होळीच्या निमित्ताने मुंबईकरांना भेट दिली आहे. होळीनिमित्त मध्य रेल्वे मुंबई ते पुणे 14 अतिरिक्त गाड्या धावणार आहे. होळी निमित्त प्रवाशांसाठी सुरळीत वाहतूक व्हावी या साठी मध्य रेल्वे कडून मुंबई-मढ, पुणे-करमाळी, पनवेल-करमाळी आणि मुंबई-दानापूर दरम्यान 14 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
 
येथे वेळापत्रक आहे
 
1. मुंबई-मऊ (2 ट्रेन)
ट्रेन क्रमांक 01009 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस 15 मार्च रोजी 14.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 23.45 वाजता मऊ येथे पोहोचेल.
 
ट्रेन क्रमांक 01010 स्पेशल 17 मार्च रोजी मऊ येथून 16.55 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 03.35 वाजता पोहोचेल.
 
2. पुणे-करमाळी-पुणे (4 फेऱ्या)
 
ट्रेन क्रमांक 01011 स्पेशल ट्रेन पुण्याहून 11 मार्च  आणि 18 मार्च रोजी 17.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता करमाळीला पोहोचेल.
 
गाडी क्रमांक 01012 स्पेशल करमाळी येथून 13 मार्च आणि 20 मार्च रोजी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पुण्याला 23.35 वाजता पोहोचेल.
 
3. पनवेल-करमाली-पनवेल (4फेऱ्या )
 
ट्रेन क्रमांक 01013 विशेष ट्रेन पनवेलला 12 मार्च आणि 19 मार्च रोजी 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता करमाळीला पोहोचेल.
 
01014 विशेष गाडी करमाळी येथून 12 मार्च आणि 19 मार्च रोजी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.00 वाजता पनवेलला पोहोचेल.
 
4. मुंबई-दानापूर (4फेऱ्या)
 
ट्रेन क्रमांक 01015 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 15 मार्च  आणि 22 मार्च  रोजी सकाळी 10.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 17.15 वाजता दानापूरला पोहोचेल.
 
ट्रेन क्रमांक 01016 स्पेशल दानापूर 16 मार्च  आणि 23 मार्च रोजी 20.25 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला तिसऱ्या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवारांनी अर्थसंकल्पात केलेल्या 9 महत्त्वाच्या घोषणा