Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या आणखी एका नेत्याला मुंबईच्या आर्थिकगुन्हे शाखेकडून क्लीन चीट

Webdunia
शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (15:01 IST)
मुंबईच्या आर्थिकगुन्हे शाखेकडून भाजपच्या आणखी एका नेत्याला  क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेने  दाखल सी समरी रिपोर्ट दिला आहे. मोहित कंबोज यांना  कथित बॅंक घोटाळा प्रकरणात पुर्णपणे  क्लीन चीट देण्यात आली आहे.
 
ओव्हरसीज बॅंकेच्या  व्यवस्थापकाने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर  तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी बॅंकेतून ज्या कंपनीसाठी 52 कोटी कर्ज  घेतले ते त्यासाठी न वापरता दुसरीकडे वापरल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंबोज यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. बँक ऑफ बडोदाने  मुंबई भाजप युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष मोहित कंभोज यांना कर्जबुडवा घोषित म्हणून जाहीर केले होते. संबंधित कंपनीचा संचालक नसल्याचे कंबोज यांनी म्हटले होते. कर्जाला जामिन देल्याने गेल्या दोन वर्षात जबाबदारी म्हणून ७६ कोटी भरल्याचा त्याने दावा केला होता.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments