Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अभिनंदन, मुंबईतील दोन शाळा देशातील टॉप टेन शाळांमध्ये समावेश

अभिनंदन, मुंबईतील दोन शाळा देशातील टॉप टेन शाळांमध्ये समावेश
, शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:10 IST)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्षण करुन ही यादी जाहीर केली आहे. 
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा दोन शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन 2021-2022(Education World School Ranking of Govt. Schools in India) या उपक्रम अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.
सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षण अंती निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs NZ 2रा T20: राहुल-रोहितच्या झंझावाताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला, धोनीच्या 'गडावर' भारताने जिंकली मालिका