Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एसटी महामंडळाकडून संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका, हायकोर्टात शुक्रवारी पुन्हा सुनावणी

एसटी महामंडळाकडून संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका, हायकोर्टात शुक्रवारी पुन्हा सुनावणी
, बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:21 IST)
आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक देण्यात आली. दरम्यान एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. एस.टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. 343 जणांविरोधात अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे.
 
एस.टी. महामंडळानं संपक-यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका सादर केली आहे. कोर्टाचा अवमान करत संप करणा-यांना नोटीस जारी करण्याची महामंडळाकडनं हायकोर्टाला विनंती करण्यात आली. संप न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश असूनही कामगार संपावर ठाम असल्याची माहिती महामंडळाकडनं हायकोर्टाला देण्यात आली. याची दखल घेत शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देत पुढील सोमवारी नियमित कोर्टापुढे सुनावणी होणार आहे. मात्र कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांच्यावतीनं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र या अवमान याचिकेला विरोध करत ही याचिका दाखल होण्यायोग्य नाही असं कोर्टाला सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक, मंत्रालयावर जाणारा मोर्चा अडवला