Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

Webdunia
शनिवार, 26 डिसेंबर 2020 (08:40 IST)
कोरोनाचा प्रसार रोखण्यात जागतिक रोल मॉडेल ठरलेल्या धारावीने आणखी एक पराक्रम करून दाखविला आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. तर तब्बल नऊ महिन्यानंतर शुक्रवारी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. सध्या या ठिकाणी केवळ १२ सक्रिय रुग्ण आहेत. 
 
धारावीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या येथे आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र  याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक केले जात आहे. प्रतिबंधक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. तर धारावीत यशस्वी ठरलेली 'चेस द व्हायरस' ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जालना: सुनेने केली सासूची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

LIVE: महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट

Terror attack in Pahalgam मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

मुंबईत जमिनीपासून १०० फूट खाली बुलेट ट्रेन स्टेशन बांधले जाणार-रेल्वे मंत्री वैष्णव

पुढील लेख
Show comments