धारावीत करोना संसर्गांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु असताना एका दिलासादायक बातमी म्हणजे या भागातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत आहे. आज धारावीत करोनाचे फक्त 6 नवीन रुग्ण आढळले तर त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील एकूण रुग्णांची संख्या आता 220 इतकी झाली आहे तर आतापर्यंत 14 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात धारावीत करोनाचे 24 नवीन रुग्ण आढळल्याने काळजीत वाढ झाली होती.
धारावी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला असून दाट लोकवस्तीमुळे येथे उपाययोजना करण्यात पालिकेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच माहीममध्ये करोनाचा आज आणखी एक रुग्ण आढळल्याने येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे.