Festival Posters
✕

आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद – मुख्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2020 (20:02 IST)
आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. केंद्र सरकारला आधीच यासंदभार्तील परवानगीच पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर यावर अंमलबजावणी करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद केली जाणार आहे. 
 
याआधी सरकारने राज्यात कलम १४४ आणि संचारबंदी लागू करत एसटी व खासगी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर आता देशांर्गत सेवाही बंद करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. देशात कोरोनाचा प्रसार हा अधिकतर परदेशातून आलेल्या लोकांमुळे झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसंच राज्यावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करू नये. मास्काचा काळाबाजार होता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली. तर सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा, असं त्यांनी म्हटलं. यावेळी देशांतर्गत सेवा बंद केल्याने व विविध परताव्यांची अंतिम तारीख पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुखमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

नवीन

मायक्रोसॉफ्ट कर्मचारी कपात योजना: मायक्रोसॉफ्टने ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली

गुवाहाटीमध्ये हॉटेलजवळ गोळीबार, एका महिलेसह ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

LIVE: विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर मतचोरीचा आरोप

महाराष्ट्रात हवामानाचा इशारा, मुंबई-पुण्यात उष्णता आणि आर्द्रता वाढणार

पुण्यात परवान्याशिवाय साबण निर्मितीचा प्रकार उघड; FDA ची कारवाई, ४.०५ लाखांहून अधिक किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त

पुढील लेख
Show comments