Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या, भरदिवसा घडलेल्या प्रकारने वाशिममध्ये खळबळ

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:22 IST)
वाशिम जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका वृद्ध रखवालदार दाम्पत्याचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भर दुपारी घरात घुसून कुऱ्हाडीने वार करुन खून केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाशिम जिल्ह्याच्या डव्हा इथं ही घटना घडली आहे.गजानन निंबाळकर-देशमुख  (वय-60) आणि निर्मला निंबाळकर-देशमुख (वय-55) अशी निर्घृण खून करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नावं आहे.
 
निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षापासून चाकातीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.आज दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या घरात शिरले आणि त्यांनी भीषण हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याने स्थानिक त्यांची चौकशी करण्यासाठी गेले त्यावेळी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठून दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ VBA आंदोलन, 25 कामगार अडकले

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांना अपशब्द वापरले

'राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा', परदेशात केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले भडकले

भिवंडीत गणपती विसर्जनाच्या दगडफेक यामुळे दोन गटात हाणामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

पुढील लेख
Show comments