सध्या अनेक विमानांना बनावट बॉम्बच्या धमक्या मिळत आहे. सोमवारी मुंबईहून येणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, त्यानंतर न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान बॉम्बची धमकी मिळाल्याने अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले. एका अधिकारींनी बुधवारी सांगितले की, विमानात बॉम्बची धमकी ही अफवा होती. या विमानात सुमारे 200 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. अधिकारींनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने विमानात बॉम्ब असल्याचा दावा ट्विटद्वारे केला. तर मुंबई एटीसीने सतर्क केल्यानंतर विमानचालकाने अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. तसेच दिल्लीला जाण्यासाठी अहमदाबाद हे जवळचे विमानतळ होते. मध्यरात्री येथे लँडिंग केल्यानंतर, सुमारे 200 प्रवासी आणि कर्मचारी असलेल्या विमानाची सुरक्षा दलांनी रात्रभर झडती घेतली, असे एका अधिकारींनी सांगितले. यावेळी त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही.
Edited By- Dhanashri Naik