Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे स्फोट, तीन जवान शहीद !

Webdunia
बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:30 IST)
मुंबइतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या  युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे. झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला.स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटात INS रणवीर युद्धनौकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
 
नौदलाकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
तसेच स्थानिक नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहेत,स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृत सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
आयएनएस रणवीर नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. ११ जवानांवर स्थानिक नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आयएनएस रणवीर २८ ऑक्टोबर १९८६ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. हे ३१० नाविकांच्या टीमद्वारे चालवले जाते. हे शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे.

त्यात पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी आणि जमिनीपासून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. याशिवाय यात क्षेपणास्त्रविरोधी तोफा आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचरही आहेत.
 
यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय नौदलाच्या आयएनएस रणविजयमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत चार जण जखमी झाले. आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी येण्याची शक्यता - केसी वेणुगोपाल

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: राहुल गांधींचा 5 लाखांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप

नंदुरबारमध्ये राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसने आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला

'तुमचा डिस्क्लेमर ट्रम्पच्या बातमीच्या खाली...', SC न्यायाधीशांनी NCP चिन्हाच्या वादावर केली टीका

Eknath Shinde Profile एकनाथ शिंदे प्रोफाइल

पुढील लेख
Show comments