शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी तीन ते चार नावांची यादी तयार केले असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर शिवसेना उबाठाचेनेते संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे ते देवेबद्र फडणवीसांना शंभर वर्षात देखील समजू शकणार नाही, अशी टीका नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली .
पत्रकारांशी बोलताना शिवसेना (UBT) नेते म्हणाले, शरद पवार काय विचार आणि नियोजन करत होते हे फडणवीसांना 2019 मध्ये माहीत होते का? त्यांनी शंभर वेळा जन्म घेतला तरी शरद पवारांच्या मनात काय चालले असेल याची कल्पनाही करता येत नाही. राज्य सरकारमध्ये थोडी हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीची तारीख जाहीर करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केवळ राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातही फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अजित पवारांनी नुकतेच वक्तव्य केले की, कुटुंबात तढी निर्माण करणे समाजाला आवडत नाही त्यावर संजय राऊतांनी म्हटले, महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि घराणे कोणी तोडले? मोदी आणि शहा यांनी राजकीय पक्ष आणि कुटुंबांमध्ये फूट निर्माण केली. यात एकनाथ शिंदे व अजित पवार बळी ठरले. त्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या, दबाव आणला गेला किंवा आमिष दाखवले गेले हे त्यांनी मान्य करावे.अशी घणाघात टीका संजय राऊतांनी केली.