Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai Taj Hotel मध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत फेक फोन कॉल

Webdunia
शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (10:51 IST)
ताज हॉटेलवर मध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत फोनवरून बनावट माहिती देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश सिंग नावाच्या व्यक्तीने फोन करून दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती दिली होती.
 
मुंबईत दहशतवादी पोहोचल्याचा खोटा दावा
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीने फोन कॉल दरम्यान सांगितले होते की तो गाझियाबाद, दिल्ली एनसीआरचा रहिवासी आहे. मुकेश सिंग असे आपले नाव सांगताना आरोपीने दावा केला होता की, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणण्याच्या उद्देशाने दोन पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे तेथे पोहोचले होते.
 
सांताक्रूझ येथून आरोपीला अटक
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ला हा फोन सांताक्रूझ भागातून आल्याचे समजले. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा बनावट फोन केला होता. पोलिसांनी फोन करणार्‍याचे नाव जगदंबा प्रसाद सिंह असून तो गोळीबार रोड येथील रहिवासी आहे.
 
फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments