Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी

Webdunia
मंगळवार, 27 जून 2023 (21:13 IST)
मुंबई, : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.
 
कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments