Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून काढले अर्धनग्न फोटो

Half-naked photo0s
, बुधवार, 12 जानेवारी 2022 (08:09 IST)
कोरोनाच्या अनेकांचे रोजगार बुडाले. आता कुठे लोकांच्या हाताला काम लागले आहे तर पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या एका बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आपण कास्टिंग
डायरेक्टर आहोत असं सांगून फसवणाऱ्या एका 24 वर्षांच्या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे लुटत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश तिवारी (वय 24) असं या तरुणाचं नाव आहे. मालाड सायबर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. या भामट्याने फेसबुकवर आपण कास्टिंग डायरेक्टर आहे असं सांगत होता. या आरोपीने आधी काही ठिकाणी काम सुद्धा केले आहे.
तरुणींना तो वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून त्यांचे फोटोशूट करायचा. त्यानंतर त्यांचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकी देऊन पैसे उकळायचा. या आरोपीने आपण नेटफ्लिक्स प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे असंही सांगत होता.
एका बंगाली अभिनेत्रीने डिसेंबर 2021 महिन्यात फेसबुकवर संपर्क केला होता.  त्यानंतर या अभिनेत्रीला मुंबईला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ओम तिवारीने या अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं आमिष दिलं.
त्यानंतर या अभिनेत्रीचे ऑडिशनच्या नावावर फोटोशूट केले. त्यानंतर या अभिनेत्रीला त्याने काम तर दिले नाही, उलट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली.पीडित तरुणी हे कोलकाता येथील राहणारी आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाली पाडले आणि विष पाजले; सूनेकडून सेवानिवृत्त पोलीस सासर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न