सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेनचा हापूस दाखल झाला आहे. हा हापूसच्या 10 आंब्यांचे 4 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. याच प्रकारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वॅाशिंग्टन, साऊथ आफ्रिका, तुर्की, इराण, बेल्जीयम, चायना, कॅलिफोर्निया या सर्व देशातून फळांची आयात केली जाते. ज्यामध्ये स्पेनचा हापूस, किवी, पेर, ब्लु बेरी, द्राक्ष यांसारख्या बऱ्याच फळांचा समावेश असतो. ही फळे अत्यंत महाग असतात.
सध्या बाजारात भारतीय सफरचंद मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विदेशी फळांच्या तुलनेत भारतीय फळे ही स्वस्त आणि चवीला उत्तम दर्जाचे असतात. तरीही काही प्रमाणात लोकांची इम्पोर्टेड फळांनाच मागणी असते.