Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबई लोकल सर्वांसाठी!

local
, मंगळवार, 5 एप्रिल 2022 (09:53 IST)
रेल्वेनं प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गुठीपाडव्याच्या दिवसापासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले. राज्य सरकारने कोविड निर्बंध हटवताना रेल्वेबाबतही एक मोठी बातमी समोर आली आहे.  
 
कोविडसंदर्भातल्या निर्बंधामुळे केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा होती. मात्र आता राज्य सरकारनं निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचं प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारनं निर्बंध उठवण्याच्या निर्देशांनुसार, रेल्वेनंही सर्व कोविडसंदर्भातले निर्बंध उठवले आहेत.
 
त्यामुळे आता मुंबईतल्या रेल्वेसाठी काऊंटरवर आणि अ‍ॅपवर सर्वांकरिता तिकिट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्याच प्रमाणपत्रं तिकिट अ‍ॅपठी लिंक करण्याची गरज नाही आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा