Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

inauguration of Shri Ram Panchayat idols in Raj Bhavan premises by the Governor
मुंबई : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारंभाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.
 
राज्यपाल श्री. बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला.
 
राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.
 
साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
 
राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.
 
श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबीय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते.
 
यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांचे कौतुक केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक: एकाच कंपनीतील तिघांचा 2 दिवसांत हृदयविकाराने मृत्यू