Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील टोल दरांमध्येही वाढ, नागरिकांना फटका

मुंबईतील टोल दरांमध्येही वाढ, नागरिकांना फटका
, शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (16:58 IST)
येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक परीस्थितीला तोंड देणाऱ्या मुंबईकरांवर आता वाढीव टोलचाही बोजा येणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. शहरातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च 2002 ते 2027 या 25 वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहे. एमईपी कंपनी आणि राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ होणार आहे.
 
नवीन दरांनुसार हलक्या वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता टोलचा 35 रुपयांवरुन 40 रुपये होईल. तर, प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन त्यासाठी आता 65 रुपये मोजावे लागणार आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 25 रुपयांची वाढ करण्यात 
आली आहे. त्यामुळे त्यासाठी आता 105 नाही तर 130 रुपये द्यावे लागणार आहेत. तर अवजड वाहनांच्या टोल दरातही 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यासाठी 160 रुपये असा वाढीव टोल द्याला लागणार आहे. 
 
हलक्या वाहनांच्या मासिक पासमध्येही वाढ करण्यात आली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पाससाठी आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये मोजावे लागणार आहे.
 
टोलचे नवे दरछोटी वाहने – 40 रुपयेमध्यम अवजड वाहने – 65 रुपयेट्रक आणि बसेस – 130 रुपयेअवजड वाहने – 160 रुपयेहलक्या वाहनांसाठी मासिक पास – 1500 रुपये

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड