Dharma Sangrah

भांडुप मध्ये मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने चाकूने हल्ला करत आत्महत्याचा प्रयत्न

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (17:57 IST)
मुंबईच्या भांडुप परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुप मध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीने महिला मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात येऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि स्वतःचा गळा चिरून घेतला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर हल्ला करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहे. 

पोलिसांनी महिलेची चौकशी रुग्णालयात जाऊन केल्यावर तिने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. काही दिवसांपासून महिलेने आरोपीशी बोलणे बंद केले होते. यावर तो चिडला आणि त्याने महिलेवर चाकूने हल्ला केला. नंतर आरोपीने आत्महत्या करण्याच्या उद्देश्याने स्वतःच्या गळावर चाकू मारून घेतला.महिलेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दलच्या अटकळांवर मौन सोडले, महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले

उद्धव यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या अभिनंदन मोर्चावर टीका केली

एफडीएने महाराष्ट्रात १५ हून अधिक सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करत त्यांच्या विक्रीवर बंदी घातली

बीएमसीचा मोठा निर्णय, प्रलंबित जन्म दाखल्याच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही केली जाईल

LIVE: महाराष्ट्र एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घातली

पुढील लेख
Show comments