Festival Posters

पक्ष्याला वाचवताना गमावला जीव

Webdunia
गुरूवार, 2 जून 2022 (20:07 IST)
वांद्रे-वरळी सी-लिंक ओलांडताना पक्ष्याला वाचवायला जाणे हे एका व्यावसायिकाच्या जीवावर बेतले आहे. सोमवारी दुपारी अमर जरीवाला आणि त्यांच्या चालकाला काळ्या-पिवळ्या टॅक्सीने धडक दिली. यात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, टक्कर इतकी जोरदार होती की जरीवाला हवेत उडून रेलिंगवर आणि नंतर कारच्या वाटेवर पडले. दोघांनाही जवळच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी जरीवाला यांना मृत घोषित केले. त्यांचा चालक शाम कामत (41) याच्यावर उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
 
अपघातानंतर पोलिसांनी टॅक्सी चालक रवींद्र कुमार जैस्वार (38) याला अटक केली असून, बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

केतन अग्रवालला जखमी करून लग्न पुढे ढकलायचे होते, मग सिया- चेतने हत्या का केली?

LIVE: नागपुरात रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करुन धिंड काढली

महिलांच्या घर सोडण्यामागे प्रेमप्रकरण मुख्य कारण; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट

साडी भेट न दिल्याने संतापल्या पत्नीने घेतला जीव! प्रेशर कुकरने डोक्यावर वार करून पतीची हत्या

पुढील लेख
Show comments