न्यायालयातील प्रलंबित असलेले तडजोडपक्ष फौजदारी प्रकरणं आणि दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी रविवार १ ऑगस्ट रोजी मुंबईतील सर्व न्यायालयात लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक पक्षकारंना आपले विनंती अर्ज न्यायालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबईचे सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही लोक आदालत घेण्यात येणार आहे.या लोक आदालतमध्ये ई -लोक आदालतीच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ई-लोक आदालतीचं आयोजन करण्यात आल्यामुळे व्हिसीच्या माध्यमातून प्रकरणांवर सुनावणी करण्यात येईल.
लोक आदालतेमध्ये धनादेश अनादराची प्रकरणे,बॅकेची कर्ज वसुली प्रकरणे,कामागारांचे वाद,विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र प्रकरण,आयकर कायद्यातील फौजदारी स्वरुपातील तडजोडपात्र प्रकरण, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबत,वैवाहिक वाद संपादन,दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरुपातील दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यात येणार आहे.