Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत 20 मजली इमारतीला भीषण आग ; 7 ठार अनेक जखमी

Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (12:32 IST)
मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, 6 वृद्धांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टमची गरज असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अडकलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. आग आटोक्यात आणली असली तरी धुराचे लोट खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अग्निशमन विभागाच्या अधिकारींच्या म्हणण्यानुसार, आग सकाळी 7.28 वाजता लागली आणि 8.10 वाजता स्तर 3 म्हणून घोषित करण्यात आले. आग विझवण्यासाठी 13 अग्निशमन दल आणि सात जंबो टँकर सेवेत लावण्यात आल्याचे विभागाने सांगितले. आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या की त्या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप प्रयत्न करावे लागले.

<

Maharashtra | A level 3 fire broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo. 13 fire engines are present at the spot; more details awaited.

— ANI (@ANI) January 22, 2022 >15 जणांना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 3 आयसीयूमध्ये तर 12 जण जनरल वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर चार जखमींना नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्यापैकी दोघांना मृत आणण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments