Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मे महिनाअखेर मुंबईकरांसाठी मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 हे मार्ग सुरू होणार

Metro-2A and Metro-7
, बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:08 IST)
येत्या मे महिनाअखेर मुंबईकरांसाठी मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 हे मार्ग सुरू होणार आहेत. दहिसर-अंधेरी (मेट्रो-7) आणि दहिसर-डी एन नगर (मेट्रो 2 ए) या मार्गिकांसाठी ट्रायल रन होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरू होतील. एकूण 576 कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होत आहेत. या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल. मात्र सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होईल. भारतातच मेट्रो कोचेसची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक कोचमागे दोन कोटी रूपये वाचले आहेत. 
 
येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. दरम्यान, ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार आहे. सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम