Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेट्रो 3 ही मुंबईची लाईफलाइन आहे : फडणवीस

Webdunia
मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (15:14 IST)
मेट्रो 3च्या पहिल्या ट्रेनची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या प्रकल्पाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. मेट्रो 3 ला कोणीही थांबवू शकत नाही. मेट्रो 3 ही मुंबईची लाईफलाइन आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे  यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेडला मंजूरी दिली आहे. जवळपास 17 लाख लोक मेट्रो वापरतील आणि 7 लाख वाहन रस्त्यावर धावायची कमी होतील. तसेच मेट्रोमुळे पर्यावरणाचा धोका कमी होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
 
कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय् तुमचे अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यावेळी या 40 किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments