मुंबईकरांसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे आधुनिक डबल डेकर बस घेण्यात येणार आहेत.यामध्ये दोन दरवाजे, दोन जिने आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. नव्या स्वरुपातील या डबलडेकर बसची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.
नवीन डबलडेकर बसमध्ये दोन्ही बाजूस दरवाजे असून ते स्वयंचलित असणार आहेत. तसेच दोन जिने असतील. बस आणि प्रवासी सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहेत.
नवीन डबलडेकर बस ही भारत-6 श्रेणीची असून त्यात स्वयंचलित गिअर असतील, असे बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. बसच्या अंतर्गत रचनेत बसथांब्यांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड पुरविण्यात येणार आहेत. तसेच डबलडेकरमध्ये दोन कंडक्टरांना परस्पर संपर्कासाठीही विशेष व्यवस्था असेल. बसमधील स्वयंचलित दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण चालकाकडे असेल. स्वयंचलित दरवाज्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल असा दावा बेस्टतर्फे केला जात आहे.