Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई : सी लिंक आज कोस्टल रोडला जोडला जाणार, उद्यापासून वाहनांची ये-जा सुरू

Webdunia
गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (09:28 IST)
मुंबई : कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग गुरुवारी वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्यात येणार असून या मार्गाने लोकांना वांद्रेपर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच कोस्टल रोड आणि सी-लिंकच्या जोडणीमुळे वरळीतील बिंदू माधव चौकात नागरिकांना आता वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. बीएमसीच्या एका अधिकारींनी सांगितले की, कोस्टल रोड आणि सी लिंक जोडल्यानंतर लोकांना मरीन ड्राईव्ह ते वरळी   लिंकवरून कोस्टल रोडने वांद्रेपर्यंत सहज पोहोचता येईल.
 
कोण उद्घाटन करणार-
मिळालेल्या माहितीनुसार हे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत उद्घाटन होणार होते, मात्र पाऊस आणि भरती-ओहोटीमुळे महिनाभर उशिराने काम पूर्ण झाले. वरळीतील माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्ह या कोस्टल रोडची एक बाजू 12मार्च 2024पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
 
तसेच चालकांना 13सप्टेंबरपासून प्रवास करता येणार असल्याचे अधिकारींनी सांगितले. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत याचा वापर करता येईल. शनिवार आणि रविवारी देखभालीसाठी ते बंद राहणार आहे. कोस्टल रोडचा दुसरा भाग सी लिंकला जोडून डिसेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असे अधिकारींनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

राज्यात पावसाची थोडी विश्रांती

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली

नवनीत राणांची पुष्पा स्टाईल व्हायरल

ऑनलाईन गेम खेळणं बंद होणार

जगप्रसिद्ध न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन

पुढील लेख
Show comments