Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासा, मुंबईत दोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांची संख्या शंभराच्या खाली

Mumbai
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:17 IST)
मार्च २०२० पासून देशभरात कोरोना कहर सुरु झाला. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या विळख्याने राज्यासह मुंबापुरीलाही घेरले होते. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी एक 'पॉझिटिव्ह' बातमी  मिळाली आहे. 
 
जवळपास २ वर्षांनी हे आज पहिल्यांदाच घडलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज सोमवारी (२१ फेब्रुवारी २०२२) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी  मुंबईत फक्त ९६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीनुसार बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८८ आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. असे असले तरी मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण १४१५ आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा- मुख्यमंत्री