suvichar

आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (11:10 IST)
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईतील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी ही माहिती दिली.
 
पोलिसांनी सांगितले की, हा विद्यार्थी अहमदाबादचा रहिवासी असून तो बीटेक (केमिकल) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण दिसल्यावर ही घटना उघडकीस आली.
 
त्याने सांगितले की मृताने कोणतीही 'सुसाइड नोट' सोडली नाही आणि प्रथमदर्शनी त्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, “प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

नागपूरला नवे पोलीस आयुक्त मिळाले, विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला

जुलै महिन्यात बँका १२ दिवस बंद राहतील, यादी पहा

१ जुलैपासून नवीन पेट्रोल-डिझेल नियम लागू होणार

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये ३० जून रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू

ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ३०० कुटुंबांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

पुढील लेख
Show comments