Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होम टेस्टिंग कीटसाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली जाहीर

Mumbai Municipal Corporation
, शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:41 IST)
घरगुती चाचण्या  किंवा रॅपिड अन्टीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना संचाच्या विक्रीबाबतचे तपशील मुंबई महापालिकेला देणे बंधनकारक  आहे. मुंबई महापालिकेने या संचाच्या वापराबाबतची नियमावली जाहीर केली आहे. आता सेल्फ टेस्ट करणाऱ्यांनी विकत घेणाऱ्यांना आपला आधार कार्ड नंबर केमिस्टला द्यावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. 
 
1 लाखांच्यावर लोकांनी सेल्फ टेस्ट केली आहे. यात 3549 पॉझिटिव्ह आलेत आहेत. या माध्यमातून कोणी वेगळा धंदा करणार असेल तर कडक कारवाई होईल, असे महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती मुंबईपालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे. 
 
होम टेस्टिंग अँटीजेन किटचे उत्पादक/वितरकांनी क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक असणार आहे . मुंबईतील केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स/डिस्पेन्सरी यांना विकल्या गेलेल्या किटचे फॉर्म A मध्ये आयुक्त , अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना ईमेल आयडी  whogmp.mahafda@gmail.com वर तसंच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर आयडी ही माहिती उपलब्ध करुन देणे उत्पादकांना बंधनकार करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगडमध्ये 6 पोलीस अधिकारी आणि 54 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण