Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून सेक्स टुरिझमचा पर्दाफाश

Mumbai Police Crime Branch exposes sex tourism Maharashtra News Mumbai News Webdunia Marathi
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मंगळवारी सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींचा सुटका करण्यात आली. एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला याआधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.
 
पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पोलिसांनी विमानतळावरच अटकेची तयारी केली होती. तिथे तीन तरुणी अधिकारी आणि ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या इतरांना भेटल्या असता कारवाई कऱण्यात आली. यावेळी पैसे आणि विमान तिकीटाची देवाण घेवाण करण्यात आली. सिग्नल मिळताच तिन्ही तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केली असता पोलिसांना मुख्या आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्यन खानला जामीन नाहीच, दिवाळी जेलमध्येच होणार?