Assembly Election News : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी काळबादेवी परिसरात 2 कोटींहून अधिक रोकड जप्त केली असून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या वसुलीची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
तसेच ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलीस चौकशी करत आहे. तर, निवडणूक आयोगही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शासकीय वाहने आणि रुग्णवाहिकांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्राचे DEO, पोलीस आयुक्त, SP, महानगरपालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठकीदरम्यान, CEC राजीव कुमार यांनी अधिकाऱ्यांना रोख, दारू, ड्रग्ज किंवा मोफत भेटवस्तू यांसारखे प्रलोभन देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखण्यास सांगितले.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रलोभनाच्या मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.